Us Msp Darat Mothi Vadha एम एस पि दरात मोठी वाढ
Us Msp Darat Mothi Vadha : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 28 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसावरील एमएसपी प्रतिक्विंटल 10 रुपये एवढी वाढविण्यात आली आहे. कृषी लागत आणि मूल्य आयोगाने सरकारकडे यापूर्वीच शिफारस केली होती. आता कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारने या आयोगाने केलेल्या शिफारशी मंजुरी दिली आहे. सरकारद्वारे वाढवण्यात आलेली एम एस पी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून च्या हंगामापासून ही सुरुवात होणार आहे. ३० डिसेंबर 2024 पर्यंत यंदाचा हंगाम सुरू राहील.2021 मध्ये उसाच्या एमएसपीत 5रुपये वाढ करून ती 290 रुपये करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये 15 रुपये वाढ करून ती 305 रुपये एवढी करण्यात आली होती. त्यात आणखी दहा रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उसाच्या यंदाच्या हंगामात एम एस पी 315 रुपये करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात उसाचे उत्पन्न