Pm kisan Yojana पी एम किसान योजना
Pm Kisan Yojana पी एम किसान योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे.
पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळण्याची वेळ जवळपास झालेली आहे. योजनेचा चौदावा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळायला हवा होता.
चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना हे हप्त्याची रक्कम मिळत असते. आणि आता हप्ता मिळून
चार महिने पूर्ण झाले आहेत. तरीपण आणखी 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी या योजनेतील चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे.
पण यावेळेस हा हप्ता पडण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
खालील कारणामुळे विलंब होत आहे.
मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या सी. एस. सी.
केंद्रावर जाऊन के.वाय.सी. करून घेणे अनिवार्य आहे.
या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यामुळे सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना के.वाय.सी. करण्यासाठी 15 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
परंतु सध्या या साइट वरती अडथळा येत असल्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
तरी शेतकऱ्यांनी या तारखेपर्यंत आपली के.वाय.सी. करून घ्यावी याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत याची कृपया शेतकऱ्यांनी दखल घ्यावी.
के.वाय.सी. केल्यानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्त्याची रक्कम पडू शकते.
यामुळे हा हप्ता पडण्यास विलंब होऊ शकतो कारण सगळ्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही.
शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्यांनी 15 जून च्या आत के.वाय.सी. करून घ्यावी. Pm Kisan Yojana.
Comments
Post a Comment