Current Affairs चालू घडामोडी
Current Affairs चालू घडामोडी: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू घडामोडी या विषयावर अभ्यास करणार आहोत.
👉 भारतीय सैन्यात तोफखाना रेजिमेंट मध्ये पहिल्यांदाच किती महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला?
Ans: पाच
:- तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश : या महिला अधिकाऱ्यांमध्ये :- ले. साक्षी दुबे, ले. महक सैनि,
ले. अदिती यादव, ले. पायस मुदगील, ले. आकांक्षा यांचा समावेश आहे.
- या महिला अधिकाऱ्यांनी चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे
👉 कोणाला अमेरिकेतील उच्च शिक्षणातील योगदानाबद्दल यंदाचा प्रतिष्ठेचा एमिग्रेंट अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला ?
Ans : नीलि बेंडापुडी.
पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या भारतीय अमेरिकन अध्यक्ष निली बेंडापुडी यांना त्यांच्या उच्च शिक्षणातील योजना बद्दल यंदाचा एमिग्रेंट अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला.
👉गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण ?
Ans : अभिलाष टॉमी.
गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारा अभिलाष टॉमी हा पहिला भारतीय आणि आशियाई खेळाडू ठरला आहे.
अभिलाष टॉमीने या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला .तो भारतीय
नौदलातील निवृत्त कमांडर आहे.
या शर्यतीत एकमेव महिला ख्रिश्चन न्यूशाफर हिने प्रथम क्रमांक पटकवला असून ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच महिला आहे.
ही स्पर्धा फ्रान्समधील "लेस सेबल्स डी ओलोने " येथून सुरू झाली.
या स्पर्धेत 11 देशातील 16 स्पर्धक सहभागी होते.
👉पाचव्या आशियाई स्पर्धेत 3000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक कोणी जिंकले ?
Ans : अमन कुमार.
पाचव्या आशियाई स्पर्धेत अमोल कुमार आणि वंशिका यांनी अनुक्रमे पुरुषांच्या आणि महिलांच्या 3000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
तर याच गटात योगेश्वर राजशेखरन आणि अंजू बाला यांनी रौप्य पदक पटकावले. Current Affairs.
Comments
Post a Comment