Arogya Varta आरोग्य वार्ता
Arogya Varta:कोरोना ने जगभरात दहशत निर्माण केली होती. आता तीन वर्षानंतर ही साथ आटोक्यात आली आहे. परंतु या आजाराचा संसर्ग झालेल्या अनेकांना आजही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
कोरोनामुळे फुफ्फुस हृदय आणि अन्य काही अवयवांचे नुकसान झाले आहे.
परंतु एम आय आर च्या नव्या तंत्रज्ञाना आधारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोना संसर्गाचा मेंदूवरही गंभीर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॅनडातील रोट मॅन रिसर्च आणि सनी ब्रुक रुग्णालयाने यासंबंधी संशोधन केले होते.
यानुसार कोरोनाचा मेंदूच्या कार्यप्रणालीवरही परिणाम झाला आहे.
कोरोनामुळे मेंदूच्या उतीचे नुकसान होते.
मेंदूतील सेरीब्यालम भागावर कोरोनाचा अन्य भागावर अधिक परिणाम झाला आहे.
त्यामुळे ब्रेन फॉग, विसराळूपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
सी डी आय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन प्रतिमा तंत्रज्ञानाद्वारे ही माहिती मिळाली असून ह्यूमन ब्रेन मॅपिंग मध्ये हे प्रकाशित झाले आहे.
संशोधनाचे मुख्य लेखक ओंग यांनी सांगितले की, कोणामुळे मेंदूच्या
उतीचे नुकसान होते.
भविष्यात या आजाराच्या संसर्गामुळे लक्ष केंद्रित करण्याच्या समस्येवर किती गंभीर परिणाम झाला याबाबतही संशोधन करण्यात येणार आहे.
असे आतापर्यंतच्या संशोधनात समजले आहे.Arogya Varta .
Comments
Post a Comment