Aabha Card आभा कार्ड

 


Aabha Card:आभा कार्ड हे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनचा एक भाग असुन या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.


आभाकार्ड म्हणजे (आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट) आरोग्याचा आयडी नंबर आहे. जो कि आपला संपुर्ण आरोग्याचा डाटा ऑनलाईन सेव्ह करण्यासाठी वापरला जाणार आहे. 

आसे हे आभाकार्ड आयडी कोणताही व्यक्ती आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तयार करु शकतो. असे तयार केलेले आभाकार्ड जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावुन आरोग्याच्या पोर्टलसोबत जोडुन घ्यायला पाहीजे.


आभाकार्ड आपण शासनाच्या NDHM.Gov.in या वेबसाईट वरुन Create ABHA Number दिसतो त्यानंतर दोन पर्याय येतात 1) Using Aadhar 2 ) Using Driving Licence येतात.


यापैकि आपण Using Aadhar हा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे जसा आपल्या कार्डवर दिलेला आहे व नंतर Next करायचे आहे.

 नंतर आपल्या आधारला लिंक असणाऱ्या मोबाईलवर ओटीपी जाईल आणि जो ओटीपी गेला आहे तो ओटीपी त्याठिकाणी रकान्यात भरायचा आहे नंतर Next बटन दाबल्यानंतर आपल्या आधारवरील जी माहिती असेल ती दिसेल ती बरोबर आहे कि नही ती पाहुन Next बटनवर क्लीक करावयाचे आहे.

 त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा जो आपल्या आधारकार्डला लिंक आहे. पुन्हा एक ओटीपी जाईल व तो आटीपी टाकल्यानंरत आपल्याला चे Next चे बटन दाबुन ई मेल आयडी विचारण होईल त्याला आपण Skip For Now क्लीक करुन आपला चौदाअंकि आभानंबर जनरेट होईल तो आभानंबर आपण जतन करुन ठेवावा.


आभाकार्ड काढल्याचे फायदे:-

१) आभा हेल्थकार्डच्या मदतीने आपणास सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार भेटणार आहे.


२) उपचारासाठी सर्वत्र रिपोर्ट किंवा स्लीप घेवुन जाण्याची गरज नाही ३) यामध्ये तुमचा रक्तगट / आजार किंवा त्रास औषधी व डॉक्टर यांची सर्व माहिती आहे.


४) तुम्हा तुमची सर्व वैदयकिय नोंदी जसे कि लॅब रिपोर्ट, प्रिस्क्रिपशन व निदान दाखवु शकता. ५ ) ऑनलाईन उपचार, टेलीमेडीसीन, खाजगी डॉक्टर, ई फॉर्मसी आणि वैयक्तीक नोंदी यासारख्या सुविधा


असतील. ६) याकार्डला विमा कंपनीशी लिंक करण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला पाच लाखापर्यंत विम्याचालाभ मिळेल. 


 ७) रुग्णालय, दवाखाने आणि विमा कंपन्यासह वैदयकिय नोंदी सहज शेअर करता येतील.Aabha Card.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Modi Gramin Aavas Gharkul Yojana मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना

Talathi Bharti तलाठी भरती

Peek Karj Information पीक कर्ज माहिती