Kusum Yojana:-कुसुम योजना
Kusum Yojana कुसुम योजना:- नमस्कार शेतकरी बांधवांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना सुरू केली आहे. नेमकी कुसुम योजना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. परंतु राज्यातील सर्व शेतकरी हा आवेदन अर्ज भरण्यासाठी एकाच वेळी आल्यामुळे अधिकृत वेबसाईटवर लोड येऊन सर्वर डाऊन ची समस्या निर्माण झाली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, तसेच शेतकऱ्यांना नोंदणी करताना नोंदणी फीस म्हणून १०० रुपये ऑनलाइन भरावे लागत होते. आणि परत सर्व डाऊन असल्यामुळे हे शुल्क परत परत भरावे लागते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.
परंतु शेतकऱ्यांना एक दिलासा भेटला आहे तो म्हणजे आता महा ऊर्जा वरती सोलर पंप साठी आता फक्त 15/रुपये भरून नोंदणी करू शकता.
म्हणजे आता नवीन सोलार पंप साठी अर्ज करताना 100 रुपये शुल्क न भरता आता फक्त 15 रुपये एवढे शुल्क भरून आवेदन अर्ज करता येणार आहे.
ही बातमी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या बातमीचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. kusum yojana
Comments
Post a Comment