Bhausaheb fundkar Falbag lagvad Yojanaभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023.
Bhausaheb fundkar Falbag lagvad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत. राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्या-टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिने सह...