Kanda Bajarbhav कांदा बाजारभाव

 

 Kanda Bajarbhav कांदा बाजारभाव : नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी जरी कांदा लागवड जास्त झाली असली तरी पण येत्या दोन महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली. सरासरी भावपातळी वाढली. पण दुसरीकडे बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा अधिक दिसते.

त्यामुळे पुढील काळात कांदा आवक कमी राहून टंचाई निर्माण होऊ शकते. त्यातच बांगलादेशने कांदा आयात खुली केल्याचाही फायदा भारतीय कांदा बाजाराला मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कांद्याचे दर सध्या टिकून आहेत. मागील १० दिवसांमध्ये कांदा दरात सुधारणा दिसून आली. यंदा रबी कांद्याला गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला होता. रबी कांदा काढणीच्या काळात पावसाचा फटका बसल्याने दराचा प्रश्न निर्माण झाला.

सरकारने आयातीला परवानगी दिल्यानंतर दरात जवळपास ३० ते ४० टक्के घट झाली. कारण भारताकडून कांदा आयात वाढू शकते, असा अंदाज येथील व्यापारी व्यक्त करत आहेत. बांगलादेशात आयातीला परवानगी दिल्यानंतर पहिल्या ४ दिवसांमध्ये ५ लाख टनांची आयात झाली. पुढील काळात आयात आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या रबीतील कांदा उत्पादन वाढल्याचे सरकारचे म्हटले आहे. पण कांदा गुणवत्ता कमी झाली. त्यामुळे बाजारात आवक जास्त आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकेल असा कांदा यंदा ३० टक्क्यांपर्यंत आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

परिणामी टिकवणक्षमता कमी होऊन दर कोसळले होते. कांद्याला अगदी २०० रुपयांपासून भाव मिळत होता. पण मे महिन्यात बाजारात येणाऱ्या कांद्याची गुणवत्ता वाढत गेली. त्यामुळे दरही वाढले. आज बाजारात कांद्याला किमान सरासरी ६०० रुपये भाव मिळाला. तर कमाल भाव १ हजार ३०० रुपये होता.

भारतात सध्या कांदा मागणी आणि पुरवठ्याचं चित्र समतोलाचं दिसतं. किंबहुना सध्या कांदा पुरवठा अधिक दिसतो. मात्र कांद्याची टिकवणक्षमता कमी झाल्याने पुरवठ्याचे गणित बिघण्याची शक्यता आहे. काही जाणकारांच्या मते, ऑगस्टनंतर कांदा आवक कमी होत जाईल.


तर ऑक्टोबरनंतर कांद्याची टंचाई भासू शकते. तर काही जाणकारांच्या मते, देशात कांदा लागवड वाढत आहे. त्यामुळे पुरवठ्यात जास्त तूट येणार नाही किंवा हंगामाच्या शेवटी जास्त टंचाई भासणार.


तसेच बांगलादेशची निर्यात खुली झाल्याने निर्यात वाढू शकते. त्यामुळे पुढील काळात कांदा दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बांगलादेश सरकारने कांदा आयातील परवानगी दिल्याचा परिणाम भारतीय कांदा बाजारावर दिसत आहे. बांगलादेशात कांद्याचे भाव ८० टका प्रतिकिलोवर पोचले होते. टका हे बांगलादेशचे चलन आहे. त्यामुळे कांदा आयातीला परवानगी देण्याची मागणी केली जात होती. kanda  bajarbhav





.

Comments

Popular posts from this blog

Modi Gramin Aavas Gharkul Yojana मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना

Talathi Bharti तलाठी भरती

Peek Karj Information पीक कर्ज माहिती