Soybean biyane:- सोयाबीन बियाणे

 

     Soybean biyane :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता लवकरच पेरणीचे दिवस आले आहेत. तर त्यासाठी सोयाबीन करण्याची तुमची इच्छा आहे काय, मग  खालील दिलेली माहिती समजून घ्या.

कृषी विभागाच्या प्रात्यक्षिकानुसार उगवण क्षमता 70% पेक्षा अधिक असल्यास वापरा घरचे सोयाबीन बियाणे आणि खर्चात बचत करा.

प्रमाणित बियाणे हे दोन वर्षापर्यंत वापरता येते.

पावसाळा तोंडावर आल्याने बियाण्यांची जमवा जमव सुरू असून बियाण्यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाकडून उगवण क्षमता चांगली असलेली बियाण्यांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन दाखवण्यात येत आहे.

सोयाबीन या पिकाचे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नसते.

एकदा प्रमाणे बियाणे वापरल्यानंतर दोन वर्षापर्यंत त्याच्या उत्पादनातून नवीन बियाणे वापरता येते. हे बियाणे वापरण्याआधी त्याचे उगवणूक क्षमता समजून घ्यावी आणि जर 70 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तर अशी बियाणे वापरावी.

आणि उगवण क्षमता जर 70% टक्के पेक्षा कमी असेल तर प्रत्येकी एक टक्का देण्यासाठी बियाण्यासाठी अर्धा किलो बियाणे जास्त टाकावे.

आणि तसेच घरगुती बियाणे वापरल्यास खर्च बचत होते.

उगवण क्षमता तपासून पाण्यासाठी 100 बिया घेऊन दहा दहा बियाणे घेऊन एका कापडामध्ये ठेवून चार ते पाच दिवस राहू द्यावे. मग उघडून बघावे त्यापैकी जर साठ बिया उगवल्या असतील तर उगवण क्षमता 60 टक्के आहे असे समजावे. जर 80 बिया उगवल्या तर उगवण क्षमता 80 टक्के आहे असे समजावे.

प्रती हेक्टरी सोयाबीन पेरणीसाठी 75 किलो पेरावे. Soybean biyane


Comments

Popular posts from this blog

Modi Gramin Aavas Gharkul Yojana मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना

Talathi Bharti तलाठी भरती

Peek Karj Information पीक कर्ज माहिती