Namo Shetkari Yojana Maharashtra नमो शेतकरी महा सन्माननिधी
Namo Shetkari Yojana Maharashtra:-2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना चालू केली आहे, या योजनेची अद्यावत माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत.
शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आली आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आर्थिक मदतीचा दुप्पट लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा केली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता 2000 रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या नावावर टाकण्यात येईल.
आता शेतकऱ्यांना केंद्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे, शेतकऱ्यांना आता आशा आहे की आपले उत्पन्न दुप्पट होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा जरूर फायदा होईल.
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये (प्रति हप्ता 2000 रुपये) सहा हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलैमध्ये पडणार आहे, दुसरा हप्ता ऑगस्ट- नोव्हेंबर व तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान पडणार आहे.
गाव तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावरील समित्या या योजनेच्या देखरेखी साठी जबाबदार असतील.
यात्रिकीसाठी समित्या शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय योजनेचा लाभ मिळेल याची दक्षता घेतील. Namo Shetkari Yojana Maharashtra.
Comments
Post a Comment