Kukkut palan : कुक्कुट पालन कर्ज योजना
Kukkut palan Yojana :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने बेरोजगार युवकांसाठी स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून कुक्कुट पालन कर्ज योजना चालू केली आहे, म्हणून ही योजना आपल्यापर्यंत आम्ही घेऊन आलो आहोत.
या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांना घेण्यात येणार आहे, आणि त्याबरोबरच आपला स्वतःचा व्यवसाय असल्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या योजनेच्या आधारे आपल्याला कुक्कुटपालनासाठी शासनाकडून माफक धनराशी मिळू शकते.
आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असाल तर या योजनेअंतर्गत अर्ज केल्यास आपल्याला बँकेकडून 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते.
जर आपले आधीच कुक्कुटपालन व्यवसाय असेल आणि त्याचा आपण विस्तार करू इच्छित असाल तर आपल्याला बँकेकडून 1.5 लाख ते 3.5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. आणि या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जापासून आपण फक्त कुक्कुटपालन सुरू करू शकतात.
ही योजना महाराष्ट्रातील फक्त बेरोजगार युवकांसाठी आहे , त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत अशा युवकांसाठी आहे.
या योजनेअंतर्गत मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बँक 7 लाखापर्यंत कर्ज देऊ शकते.
या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बँकेतून करू शकतो.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील व्यक्तीसाठी मर्यादित आहे.
एखादा व्यक्ती आधीपासून शेळीपालन मत्स्य पालन करत असेल तरीही त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, कुक्कुट पालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी तसेच गैरसरकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला या व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड.
- मतदान कार्ड.
- रेशन कार्ड.
- रहिवासी दाखला.
- सातबारा उतारा.
- पासपोर्ट साईज फोटो.
- बँक अकाउंट नंबर.
- मोबाईल नंबर.(kukkut palan Yojana)
Comments
Post a Comment