Vanrakshak Bharti :- 2023
Vanrakshak Bharti:- 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपल्यासाठी सरकारी नोकरी घेऊन आलो आहोत, महाराष्ट्र राज्यामध्ये वनविभाग अंतर्गत नोकर भरती जाहीर झाली आहे.
वनविभागातील वनरक्षक गट (क) सरळसेवेमार्फत भरायचे आहेत.
खाली दिलेल्या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक समजून घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. खाली दिलेल्या संकेतस्थळावर या पदाकरता ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल.
इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, व उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहून अध्यायवत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
एकूण पदे :-2138
:-शैक्षणिक पात्रता:- उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12वी)
ही विज्ञान किंवा गणित/भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
:-अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
:-माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10)उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
:-नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले व मरण पावलेल्या वन खबरे व वन कर्मचारी यांच्या पाल्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केले असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे.
मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे ,बोलणे) आवश्यक आहे.
खेळाडू साठी 2.5 सेमी सवलत देण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वन खबरे तसेच वन कर्मचारी यांच्या पाल्यास उंची मध्ये 2.5 सेमी सूट देण्यात आली आहे
छातीचे मोजमाप आवश्यक नाही.
ऑनलाइन परीक्षा:- ऑनलाइन अर्जातील पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची(60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. टी. सी .एस. (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) यांच्या मार्फत घेण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (10वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
सामान्य ज्ञान या विषयांमध्ये सामाजिक इतिहास, राज्याचा भूगोल, पर्यावरण ,हवामान यांचा समावेश राहील. Vanrakshak Bharti 2023.
👇👇येथे क्लिक करा 👇👇
www.mahaforest.gov.in
Comments
Post a Comment