Talathi Bharti तलाठी भरती
Talathi Bharti तलाठी भरती : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यामधील तलाठी भरती जाहीर झाली आहे.
राज्यातील तलाठी गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हे पदे सरळ सेवा मार्फत भरण्यात येणार आहेत.
ही परीक्षा भुमिअभिलेख विभागाकडून घेण्यात येणार आहे.
त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील रखडलेली पद भरती आता सुरू होणार आहे. राज्यातील सहा विभागाअंतर्गत 36 जिल्ह्यामध्ये ४,६४४ पदांचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टी.सी.एस. या कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांची विकल्प दिली आहेत.
या भरतीमध्ये पेसा नियमानुसार जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
येत्या 15 जून पर्यंत ही लिंक खुली होईल अशी अपेक्षा आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून फॉर्म भरता येणार आहे.
परीक्षा शुल्क बाबत. खुल्या गटासाठी 1000 रुपये. व आरक्षण गटासाठी 900 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी सुरु.
प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात साठी एकच प्रश्नपत्रिका राहील असा अंदाज आहे.
15 जून पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
त्यानंतर 21 दिवसाची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी देण्यात येत आहे.
या परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्याचे भूमि अभिलेख ठरवले आहे. Talathi Bharti
Comments
Post a Comment