Nau Rajyanna High Alert नऊ राज्यांना हाय अलर्ट
Nau Rajyanna High Alert : महाराष्ट्रासह भारतातील नऊ राज्यांना हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सध्या मान्सून पाऊस हा तळ कोकणात आहे. परंतु बिपर जॉय या चक्रीवादळाने हवेतील आद्रता शोषून घेतली त्यामुळे पावसाची गती मंदावली आहे.
भारतीय हवामान विभागाने नऊ राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दमन दिव व दादरा नगर हवेली, लक्षद्वीप
भारतीय हवामान विभागाने बीपर या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या किनारी भागात अलर्ट जारी केला आहे.
सध्या या चक्रीवादळाने जरी आपली तीव्रता कमी केली असली, तरी पण या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गुजरात मध्ये मोठ्या नुकसानीची शक्यता आहे .
ईशान्य अरबी समुद्रातील अतिशय तीव्र चक्रीवादळ बिपर जॉय गेल्या सहा तासात वेग वाढून प्रति तास तीन किलोमीटर या वेगाने उत्तरेकडे सरकले आहे.Nau Rajyanna High Alert.
Comments
Post a Comment