Posts

Showing posts with the label pikkarjinformation

Peek Karj Information पीक कर्ज माहिती

Image
Pik Karj Information पीक कर्ज माहिती : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पीक कर्ज घेत असाल तर ही माहिती आपल्यासाठी आहे. :-   राज्यातील शेतकऱ्यांना विविध बँकांकडून दरवर्षी पीक लागवड व मशागतीसाठी कर्जे दिली जातात. या कर्जांचा कालावधी शक्यतो १२ ते १८ महिने कालावधीचा असतो. कापणीनंतर पीक विकून हे पीककर्ज फेडणे व पुन्हा दुसऱ्या हंगामासाठी कर्ज घेणे असे चक्र सतत सुरू असते. :-शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज कोणत्याही गहाण व्यवहाराशिवाय बँकांनी द्यावे, अशा सूचना रिझर्व बँकेच्या आहेत. त्यामुळे अशी पीककर्ज मिळवण्यासाठी आपण शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सातबारा दाखल करून घेतले जाते.  बँकेकडून गहाण व्यवहाराशिवाय शेतकरी कर्ज घेतात व नियमित फेडतात. मात्र, एकाच जमिनीचा सातबारा अनेक ठिकाणी दाखवून दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम अनेक बँकांकडून कर्जापोटी घेण्याचे प्रकार होतात. अशा प्रकरणांमध्ये कर्जफेड होत नाही. त्यामुळे शेतकरीही अडचणी येतात. या गोंधळाला पायबंद घालण्यासाठी प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला. कारण, न फेडलेली कर्जे ही बँकांची फार मोठी डोकेदुखी बनली आहे, असे ...