Vihir Anudan विहिर अनुदान
Vihir Anudan :- शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये तुम्हाला विहीर खोदायचे असेल तर आता या विहिरीसाठी अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर विहीर खोदली गेली तर एक सिंचनाचा घटक तुमच्या शेतामध्ये उपलब्ध होईल.तुमच्या शेताला पाणी मिळेल आणि या पाण्यामुळे तुमच्या शेतीतून निघणारा जे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने घेता येईल.
यासाठी 100% अनुदान आहे चार लाख रुपये तुम्हाला या विहिरीसाठी दिले जातात.खरंच तुमच्या शेतामध्ये जर विहीर नसेल तर त्या विहिरीचा फायदा घ्या तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा कोणते लाभार्थी या विहिरीसाठी लाभ घेऊ शकतात त्यानंतर लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याची पूर्ण माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कोणते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये अनुसूचित जातीचे लाभार्थी असतील अनुसूचित जमाती भटक्या जमाती दारिद्र्य खालील कुटुंब असतील इस्त्री कुटुंबाची प्रमुख असेल ते सुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात शारीरिक विकलांग व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मित्रांनो इंद्रा आवास योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभार्थी असाल त्यांना सुद्धा या योजने अंतर्गत चार लाख रुपये विहिरीसाठी दिले जातात त्यानंतर पुढे सांगण्यात आलेला आहे सीमांत शेतकरी म्हणजेच अडीच हेक्टर पर्यंत ज्या शेतकऱ्यांची शेती आहे असे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
विहिरिसाठी चार लाख रुपये मिळू शकतात त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी सुद्धा या योजनेचा म्हणजेच विहिरीसाठी लाभ घेऊ शकतात.
👇👇👇👇👇
:- योजनेसाठी अवशक कागदपत्रे :-
-७/१२ आणि ८ अ
- जॉब कार्ड प्रत
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- कास्ट सर्टिफिकेट
- पूर्व सम्मति( Vihir Anudan )
Comments
Post a Comment