Posts

Modi Gramin Aavas Gharkul Yojana मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना

Image
  Modi Gramin Aavas Gharkul Yojana मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना : ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड यादी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली आहे... राज्य शासनाचे 'सर्वांसाठी घरे - २०२४' हे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील बेघर, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे, असा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत... २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणात प्राधान्यक्रम यादीत ज्या कुटुंबांचा समावेश नव्हता, अशा पात्र कटुंबासाठी 'आवास प्लस' (प्रपत्र-३) सर्वेक्षण करण्यात आले. मात्र या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीत राज्यातील मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थ्यांची नावे विविध कारणांमुळे अंतर्भूत होऊ शकली नाहीत. इतर मागास प्रवर्गातील पात्र ल

Us Msp Darat Mothi Vadha एम एस पि दरात मोठी वाढ

Image
  Us Msp Darat Mothi Vadha :  देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 28 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसावरील एमएसपी प्रतिक्विंटल 10 रुपये एवढी वाढविण्यात आली आहे. कृषी लागत आणि मूल्य आयोगाने सरकारकडे यापूर्वीच शिफारस केली होती. आता कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारने या आयोगाने केलेल्या शिफारशी मंजुरी दिली आहे. सरकारद्वारे वाढवण्यात आलेली एम एस पी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून च्या हंगामापासून ही सुरुवात होणार आहे. ३० डिसेंबर 2024 पर्यंत यंदाचा हंगाम सुरू राहील.2021 मध्ये उसाच्या एमएसपीत 5रुपये  वाढ करून ती 290 रुपये करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये 15 रुपये वाढ करून ती 305 रुपये एवढी करण्यात आली होती. त्यात आणखी दहा रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उसाच्या यंदाच्या हंगामात एम एस पी 315 रुपये करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात उसाचे उत्पन्न

Aabha Card आभा कार्ड

Image
  Aabha Card: आभा कार्ड हे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनचा एक भाग असुन या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आभाकार्ड म्हणजे (आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट) आरोग्याचा आयडी नंबर आहे. जो कि आपला संपुर्ण आरोग्याचा डाटा ऑनलाईन सेव्ह करण्यासाठी वापरला जाणार आहे.  आसे हे आभाकार्ड आयडी कोणताही व्यक्ती आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तयार करु शकतो. असे तयार केलेले आभाकार्ड जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावुन आरोग्याच्या पोर्टलसोबत जोडुन घ्यायला पाहीजे. आभाकार्ड आपण शासनाच्या NDHM.Gov.in या वेबसाईट वरुन Create ABHA Number दिसतो त्यानंतर दोन पर्याय येतात 1) Using Aadhar 2 ) Using Driving Licence येतात. यापैकि आपण Using Aadhar हा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे जसा आपल्या कार्डवर दिलेला आहे व नंतर Next करायचे आहे.  नंतर आपल्या आधारला लिंक असणाऱ्या मोबाईलवर ओटीपी जाईल आणि जो ओटीपी गेला आहे तो ओटीपी त्याठिकाणी रकान्यात भरायचा आहे नंतर Next बटन दाबल्यानंतर आपल्या आधारवरील जी माहिती असेल ती दिसेल ती बरोबर आहे कि नही ती पाहुन

Peek Karj Information पीक कर्ज माहिती

Image
Pik Karj Information पीक कर्ज माहिती : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पीक कर्ज घेत असाल तर ही माहिती आपल्यासाठी आहे. :-   राज्यातील शेतकऱ्यांना विविध बँकांकडून दरवर्षी पीक लागवड व मशागतीसाठी कर्जे दिली जातात. या कर्जांचा कालावधी शक्यतो १२ ते १८ महिने कालावधीचा असतो. कापणीनंतर पीक विकून हे पीककर्ज फेडणे व पुन्हा दुसऱ्या हंगामासाठी कर्ज घेणे असे चक्र सतत सुरू असते. :-शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज कोणत्याही गहाण व्यवहाराशिवाय बँकांनी द्यावे, अशा सूचना रिझर्व बँकेच्या आहेत. त्यामुळे अशी पीककर्ज मिळवण्यासाठी आपण शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सातबारा दाखल करून घेतले जाते.  बँकेकडून गहाण व्यवहाराशिवाय शेतकरी कर्ज घेतात व नियमित फेडतात. मात्र, एकाच जमिनीचा सातबारा अनेक ठिकाणी दाखवून दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम अनेक बँकांकडून कर्जापोटी घेण्याचे प्रकार होतात. अशा प्रकरणांमध्ये कर्जफेड होत नाही. त्यामुळे शेतकरीही अडचणी येतात. या गोंधळाला पायबंद घालण्यासाठी प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला. कारण, न फेडलेली कर्जे ही बँकांची फार मोठी डोकेदुखी बनली आहे, असे महसूल विभागाती

Bhausaheb fundkar Falbag lagvad Yojanaभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023.

Image
  Bhausaheb fundkar Falbag lagvad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत.  राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्या-टप्प्याने बंद केले आहे.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत.  सबब, राज्यामध्ये ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे.  ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच

Maharashtra Recruitment News

Image
  Maharashtra Recruitment News : जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा  यांनी दिली.  महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. मंत्री लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने एक हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात.  त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत राज्यात ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार १०४ रोजगार मेळाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छुक उमेदवारांचा

Bhartiya Reserve Bank

Image
  Bhartiya Reserve Bank :  नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला माहिती पाहिजे की भारतीय रिझर्व बँकेने नोटा संबंधी काय नवीन निर्णय घेतला आहे.    हा प्रश्न राज्यसभेत सरकारला विचारला असता वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, आरबीआयने 2000 रुपयांच्या नव्या नोटा 2016 मध्ये जारी केल्या आहेत. असा प्रश्न राज्यसभा खासदारांनी सरकारला केला. असा प्रश्न राज्यसभा खासदार राजमणी पटेल यांनी सरकारला विचारला. ज्याला अर्थ राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.  खासदारांनी सरकारला विचारले की आरबीआय महात्मा गांधी नोटांच्या नवीन मालिकेसह 2000 रुपयांच्या नवीन नोटा जाहीर करत आहे का? तसे असल्यास,  या नोटा कोणत्या पद्धतीने जारी केल्या जात आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2016 मध्येच महात्मा गांधी (नवीन) मालिकेत 2000 रुपयांच्या नवीन डिझाईनच्या नोटा जारी केल्या आहेत. राजमणी पटेल यांनी सरकारला विचारले की सरकारने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणू नयेत अशा अनिवार्य सूचना दिल्या आहेत का?  त्याऐवजी या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा करा. या प्रश्ना